झारखंडमध्ये बसचा भीषण अपघात; 11 ठार

    दिनांक :10-Jun-2019
हजारीबाग,
 
झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत आज सकाळी एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.