वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

    दिनांक :10-Jun-2019
मुरमाडी: सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी येथील ६८ वर्षीय तुळशीराम पेंदाम हे काल शेतात गेले असता सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या घटने नंतर परिसरात भीतीचे आहे.
 
 
 
 खासदार अशोक नेते यांनी आज 10 जून रोजी मुरमाडी येथे भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांना वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याचे सुचना केल्या .
याप्रसंगी माजी आमदार अतुल देशकर, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीचंद गणवीर, सिंदेवाही पं स चे सभापती मधुकर मडावी, ACF राजेश्वरी बोगाळे, RFO गोंड, दिलिप जाधव, व गावातील नागरिक उपस्थित होते.