मुस्लिमांमुळेच राहुल जिंकले : ओवैसी

    दिनांक :10-Jun-2019
 हैदराबाद: वायनाडमध्ये मुस्लिमांमुळेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय झाला, तसेच भाजपाला हरवण्याची ताकत प्रादेशिक पक्षांतच आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ते तेलंगणामध्ये एका सभेला संबोधित करत होते.
खासदार ओवैसी यांनी सांगितले की, भारत स्वातंत्र झाला त्यावेळी आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की आता नवा भारत उदयाला येत आहे. हा भारत देश गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कोट्यवधी लोकांचा असेल. मला अजूनही अपेक्षा आहे की भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको, तर हक्क हवेत असे ओवैसी म्हणाले.
 

 
 
कॉंग्रेसला ताकद, विचार आणि कठोर मेहनत घेण्याची इच्छा नाही. दुसरीकडे अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा हरली आहे. भाजपाला कॉंग्रेसने हरवले नाही.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसारख्या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आणि वायनाड येथून निवडून आले. कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम जनता आहेत, असेही ओवैसी यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओवैसी यांनी भाजपावर टीका केली होती. मुस्लिम समाजाला देशात बरोबरीचे हक्क आहेत. मुसलमान भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहोत, असेही ते म्हणाले होते. घ(वृत्तसंस्था)