आलापल्ली -चंद्रपूर मार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट

    दिनांक :10-Jun-2019
 
अहेरी: अहेरी तालुक्यातील वेलगुर बोटला चेरू येथून छत्तीसगढ येथील सौदड येथे तेंदूपत्ता घेऊन जाणारा ट्रक शॉर्ट सर्किट मूळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. ही घटना आज दुपारी 4:15वाजताच्या सुमारास घडली.
सुदैवाने या ट्रक मध्ये चालक सोडून कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी ट्रक मालक व तेंदूपत्ता ठेकेदाराचे लाखोंचे नुकसान झालेले आहे.

 
 
 
आज दुपारच्या सुमारास ट्रक क्र. सी जी 08 ए एच 9111 दमन मंदिप रोड लाईन्स यांच्या मालकीचा असलेला ट्रक खलीलुर रहमान वरंगल यांचा तेंदूपत्ता भरून बोटला चेरू येथून निघाला असताना आलापल्ली येथील वेलगुर रोड वरील विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट मुळे तेंदूपत्ता पुड्याला आग लागली ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून जळता ट्रक गावाच्या बाहेर असलेल्या जैव विविधता पार्क जवळ आणून ट्रक मधून उडी मारली.क्षणार्धात आगीने ट्रक ला आगीच्या कवेत घेतले यात ट्रक व तेंदूपत्ता धु धु करीत जळाला.
यात ट्रक मालक व तेंदूपत्ता ठेकेदार यांचे 40 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो आहे.