विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

    दिनांक :11-Jun-2019
औरंगाबाद,
कागदपत्रांवरुन शासनाच्या इनामी जमिनीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे सकृदर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. के.के. सोनवणे यांनी सोमवारी दिले. 

 
मात्र, १९९१ साली सदर जमीन देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्गाने विकत घेतली आहे. त्यावेळी रेकॉर्डवर ही जमीन शासनाची किंवा न्यासाची असल्याची कुठलीही नोंद नव्हती. उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाविरुद्ध हस्तक्षेप धनंजय मुंडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांचे वकील सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी सांगीतले.
दरम्यान, अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स यासाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कोणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतली नाही. मात्र शेतकऱ्यांना व बँकांना ५४०० कोटी रुपयांना बुडवणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई असलेल्या राजाभाऊ गड यांच्या कडून सूडबुद्धीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरुद्ध खोटे आदेश मा. नायायाल्याकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.