भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड

    दिनांक :11-Jun-2019
नवी दिल्ली,
टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची १७व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या खासदारांना ते सदस्यता आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्यांनी आतापर्यंत सात वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. वीरेंद्र कुमार हे मध्य प्रदेशातील टिकमगडचे खासदार आहेत. त्यांनी सागर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ते टिकमगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाचा कार्यभार होता. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जात नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्ष कामकाज सांभाळतात. हंगामी अध्यक्ष हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला केले जाते. हंगामी अध्यक्ष सभागृहातील इतर खासदारांना शपथ देतो. नव्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर हंगामी अध्यक्षांचा कार्यभाग संपुष्टात येतो.