#ICCWorldCup2019 : अखेर आफ्रिकेचे गुणांचे खाते उघडले

    दिनांक :11-Jun-2019
साउदम्पटन,
वेस्ट इंडिजच्या शेल्ड्रॉन कॉट्रेल (2/18) याच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेची 7.3 षटकांमध्ये 2 बाद 29 अशी दयनीय स्थिती झाली. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेची नामुष्की टळली. साहजिकच दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. आफ्रिकेला या स्पर्धेतील पहिल्या तीनही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
 
 
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या निर्णयास साजेशी सुरुवात कॉट्रेल याने करून दिली. या स्पर्धेत अद्याप अपेक्षेइतका प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरलेला हाशिम आमला पुन्हा झटपट बाद झाला. त्याने फक्त सहा धावा केल्या. पाठोपाठ एडन मरक्रम यानेही तंबूचा रस्ता पकडला. सामना अनिर्णित घोषित करण्यात आला, त्यावेळी क्विन्टॉन डी कॉक याच्या नाबाद 17 धावा होत्या. फाफ डुप्लेसिस याने खातेही उघडले नव्हते.