फ्रान्सकडून रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी आर्थिक मदतीची घोषणा

    दिनांक :11-Jun-2019
नवी दिल्ली,
भारतातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी भारतीय रेल्वे स्टेशन विकास निगमने (आयआरएसडीसी) आज सोमवारी फ्रान्सीसी राष्ट्रीय रेल्वे (एसएससीफफ) आणि फ्रान्सीसी विकास एजन्सी (एएफडी) यांच्यासोबत त्रिपक्षीय करार केला आहे. यानुसार भारतातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी सात लाख युरो म्हणजेच जवळपास 54.60 कोटी रुपये मिळणार आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी, फ्रान्सचे राज्यमंत्री जीन बॅप्टिस्ट लेमॉयने, भारतातील फ्रान्सचे राजदूत ॲलेक्झेंडर जील्गर आणि भारतीय रेल्वेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. 

 
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या करारानुसार एएफडी भारतात रेल्वे स्टेशनवरील सुविधा आणि विकासासाठी सहयोग करणार आहे. आयआरएसडीसीचे तांत्रिक भागीदार म्हणून एसएनएफ-हब्स आणि कॉनेक्जियन्सच्या माध्यमातून सात लाख युरोपर्यंत अनुदान देण्यासाठी सहमती दर्शविली आहे. यामुळे आयआरएसडीसी किंवा भारतीय रेल्वेवर कोणतीही वित्तीय जबाबदारी पडणार नाही.
 
दरम्यान, भारतीय रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आणि स्टेशनांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देत आहे. रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी प्रवाशांना सुरक्षतेच्या कारणास्तव असलेल्या सुविधा रेल्ने प्रशासन उपलब्ध करुन देत आहे. यासोबतच देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर wifi सेवा देण्यात येत आहे. तसेच, A1 कॅटगरीतील रेल्वे स्टेशन 100 दिवसांत आधुनिक करण्याचा अजेंडा आहे. यामध्ये सूरत, रायपूर, दिल्ली कँट आणि रांची यासारख्या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.