#ICCWorldCup2019 : तो फक्त हात गरम करत होता : फिंच

    दिनांक :11-Jun-2019
लंडन, 
रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू ॲडम झाम्पाने ऊब घेण्यासाठी (गरम करण्यासाठी) हात पॅण्टच्या खिशात घातले होते, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंचने केला आहे. झाम्पा चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर कर्णधाराला स्पष्टीकरण द्यावे लागले. 
 
 
गतवर्षी स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे दोघे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी ठरले होते व त्यांना एका वर्षाची बंदीची शिक्षा भोगावी लागली होती. इंग्लंडमध्ये थंडी असते तेव्हा प्रत्येक खेळाडू हात गरम करण्यासाठी स्वत:कडे हॅन्डवॉर्मर ठेवतो. झाम्पा असेच करीत होता, यात विशेष काहीही नाही, असे ट्विट करत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने झाम्पाचा बचाव केला.
 
 
मात्र, झाम्पाला या गोष्टीवरून सोसिअल मीडियावर ट्रॉल करण्यात आले आहे. झाम्पा आपल्या खिशात काय लपवत आहे? हे आपण पाहत आहात, मात्र ICC धोनीचे ग्लोव्ह चेक करण्यात व्यस्त आहे असे एका युझरने लिहिले.