ममतादीदींनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनण्यापासून रोखावे

    दिनांक :11-Jun-2019
पाटणा,
पश्चिम बंगालमधील  भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस वाढत असून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल जनता दल युनायटेडच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनण्यापासून ममतादीदींनी रोखावे, असे आवाहन जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी केला आहे. 

 
अजय आलोक म्हणाले की, पश्चिम बंगालमधून बिहारी लोकांना बाहेर काढले जात आहे. आणि तेथे सातत्याने हत्या होत आहेत. ममतादीदींनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखावे, असे आवाहन आलोक यांनी ममता बॅनर्जी यांना केले आहे.
  
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांना अभिनंदन आणि धन्यवाद केले होते. बिहारच्या बाहेर जेडीयू आणि एनडीए आघाडी करणार नाहीत यासाठी मी नितीशजींना अभिनंदन आणि धन्यवाद करत आहे, असे ममता यांनी ट्विट केले होते.