#ICCWorldCup2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यावरही पावसाचे सावट

    दिनांक :11-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
नॉटिंगहॅम,
गुरुवारी ट्रेंट ब्रिज येथे होणार्‍या भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या आयसीसी विश्वचषक सामन्यावरसुद्धा पावसाचे सावट राहणार आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारच्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अर्थात एक डाव होण्याची शक्यता आहे. 

 
 
गेल्या दोन दिवसांपासून इंग्लंडमध्ये सतत पाऊस पडत असून स्थानिक हवामान विभागाने स्थानिक रहिवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. या आठवड्यात नॉटिंगहॅममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बर्मिंगम, पीटरबॉरो व न्यू कॅसल येथेसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.