ईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन

    दिनांक :11-Jun-2019
मुंबई,
ईशा देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडची अभिनेत्री ईशा देओल हिच्या घरी एका नव्या पाहूण्याचं आगमन झालंय. ईशा पुन्हा एकदा आई झालीये. काल तिनं एका गोड मुलीला जन्म दिला असून सोशल मिडीयावरून तिनं ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
 
 
उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत ईशा २०१२ साली विवाहबंधान अडकली होती. लग्नानंतर पाच वर्षांनी भरत आणि ईशाच्या घरी पहिल्यांदा पाळणा हलला. तिला पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर २ वर्षांनी ईशा पुन्हा एकदा आईपणाचं सुख अनुभवतेय. १० जून रोजी ईशाने परत एकदा एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ही बातमी तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे.
ईशानं या नव्या बाळाचं नाव 'मिराया' असं ठेवलय. 'जे प्रेम आणि आशिर्वाद तुम्ही दिलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद' अशा मजकूरासोबत ईशाने एक फोटो शेअर केलाय. फोटोत नव्या बाळाची जन्म तारीख आणि नाव लिहीलयं. तसंच, बाळाची मोठी बहीण राध्या आणि आई-बाबा यांची नावं लिहीली आहेत.