अमेरिकेला सगळेच लुटण्याचा प्रयत्न करतात : डोनाल्ड ट्रम्प

    दिनांक :11-Jun-2019
वॉशिंग्टन, 
अमेरिका ही अशी बँक झाली आहे, ज्याला सर्वजण लुटण्याचा प्रयत्न करत असतात, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला उद्देशून म्हटले आहे. भारताने नुकताच अमेरिकतून आयात होणाऱ्या दुचाकीवरील आयात शुल्क ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आयात शुल्क कमी केले असले तरी स्वीकार केले जाऊ शकत नसल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. त्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे ट्रम्प अजूनही समाधानी असल्याचे दिसत नाही.   

 
 
भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या दुचाकीवरील शुल्क कमी केले असले ते अधिकच आहे आणि त्याचा स्वीकार केला जाऊ शकत नसल्याचे ट्रम्प म्हणाले. आपल्या नेतृत्वाखाली कोणीही आता अमेरिकेची दिशाभूल करू शकणार नाही. भारत जेव्हा अमेरिकेत दुचाकी निर्यात करतो तेव्हा त्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. सध्या हे शुल्क कमी केले असले तरी ते अधिकच असून ते कमी करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे शुल्क ५० टक्क्यांनी कमी केले असल्याचे त्यांनी सांगितले. आयात शुल्क ५० टक्क्यांनी कमी केले असले तरी ते अस्वीकार्य आहे. अमेरिका अशी बँक आहे, ज्याला प्रत्येकजण लुटण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या अनेक काळापासून हे सुरू आहे. ८०० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या आसपास अन्य देशांकडून व्यापारात आम्हाला नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.