अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली विकासासाठी नव्या संस्थेस मंजुरी

    दिनांक :11-Jun-2019
अंतराळातील संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या सैन्य दलाचे लष्करी सामर्थ वाढवण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारने एका नव्या संस्थेस मंजुरी दिली आहे. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी ही संस्था अत्याधुनिक युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञानाचा विकास करेल.
 
 
पंतपतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखील सुरक्षाविषयक कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी या नव्या संस्थेची माहिती दिली. डिफेन्स रिसर्च एजन्सी (डीएसआरओ) असे नाव असेलेली या नव्या संस्थेला अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी देण्यात आली असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी एएनआयला सांगितले आहे.
 
 
सरकारकडून काही वेळापूर्वीच सर्वोच्च स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता संयुक्त सचिव-स्तरावरील शास्त्रज्ञांद्वारे या संस्थेची बांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. या संस्थेसाठी शास्त्रज्ञांचा एक गट काम करेल, जो की तिन्ही सैन्यदलाच्या अधिका-यांशी समन्वय साधुन असेल. ही संस्था डिफेन्स स्पेस एजन्सी (डीएसए) ला संशोधन व विकास कार्यात मदत करणार आहे. ज्यामध्ये तिन्ही सेवा दलांचा समावेश असेल.डीएसएची निर्मिती ही अंतराळातील युद्धात देशाची मदत करण्यासाठी करण्यात आलेली आहे.