इस्रायलमध्ये भारतीयाची हत्या

    दिनांक :11-Jun-2019
तेल अविव,
इस्रायलच्या तेल अविव येथील अपार्टमेंटमधील भाडेकरूंमध्ये झालेल्या वादातून भारतीय वंशाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 
 
केरळच्या जेरम आर्थर फिलीप यांना शनिवारी रात्री त्यांच्या अपार्टमेंटमध्ये भोसकण्यात आले. तर, केरळच्याच ६० वर्षीय पीटर झेव्हियर यांची प्रकृती आता स्थिर आहे. खून करणारेही भारतीयच असावेत आणि बळी गेलेल्यांच्याच अपार्टमेंटमध्ये ते राहात असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. भाडेकरूंमध्ये झालेल्या वादानंतर दोघांनाही भोसकण्यात आले होते.