ऑलिम्पिक प्रवेशापासून 'हा' भारतीय तिरंदाज एक पाऊल दूर

    दिनांक :11-Jun-2019
डेन बॉश्क (नेदरलॅण्ड), 
भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने जबरदस्त प्रदर्शन करत नॉर्वेला 5-1 ने पराभूत करून येथे सुरु असलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय पुरुष संघ ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी केवळ एक विजय दूर आहे. भारतीय महिला रिकर्व्ह संघसुद्धा ऑलिम्पिक कोटा मिळविण्याच्या शर्यतीत आहे. 
 
 
तरूणदीप राय, प्रवीण जाधव व अतनू दास या त्रिकुटांना 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पुढील फेरीत कॅनडाच्या एरिक पीटर्स, क्रिस्पिन ड्युनास व ब्रायन मॅक्सवेल यांच्याविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे.
आठ ऑलिम्पिक कोटापैकी एक मिळविण्याच्या शर्यतीत भारतीय महिला रिकर्व्ह संघसुद्धा आहे. 55 राष्ट्रांचे संघ या शर्यतीत आहे. बुधवारी भारतीय महिला संघाला ऑलिम्पिक कोटासाठी निर्णायक फेरीत अकरावे सीड बेलारूस संघाविरुद्ध झुंज द्यायची आहे. लैशराम बोम्बायला देवी, दीपिका कुमारी आणि कोमलिका बारी यांना आपल्या कौशल्याची चुणूक दाखवावी लागणार आहे.