घरावर झाड कोसल्याने कुटुंब उघड्यावर

    दिनांक :11-Jun-2019
सामान्य परीवारावर आर्थिक संकट
 
गिरड: गेल्या शेकडोवर्ष ज्या झाड़ाने ऊन, वारा, पावसापासुन नागरिकांचे संरक्षण केले तेच चिंचेचे झाड वादळाने घरावर कोसळले आणि सामान्य कुटुंबाला बेघर केले. ही घटना कोरा गावात घडली आहे हे चिंचेचे झाड रमेश मडावी यांच्या घरावर कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र या वेळी मडावी परीवार घराबाहेर असल्याने मोठी जिवीत हानी टळली.

 
 
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील कोरा येथिल रमेश मडावी यांच्या घराजवळ शंभर वर्षांपूर्वीचे चिंचेचे भले मोठे झाड होते.आज रमेश मडावी व त्यांच्या परीवारसह विवाह समारंभासाठी हिंगणघाटला गेले असता . सांयकाळच्या सुमारास हे झाड अचनाक मुळासह घरावर कोसळल्याने यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रमेश मडावी यांनी मागील वर्षी पैश्याची जुळवाजुळव करून विटाचे पक्के घर बांधले होते. एक वर्ष घरात राहत नाही तर या चिंचेच्या झाडाने त्यांचे स्वप्न उध्दवस्त केले. सुदैवाने यावेळी घरात कोणी हजर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.