लियोनेल मेस्सी जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू

    दिनांक :12-Jun-2019
न्यू यॉर्क,
अर्जेंटिना व बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हा गतवर्षी क्रीडा जगतातला सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. फोर्ब्सने मंगळवारी श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत मेस्सी अव्वल स्थानावर असून त्याने निवृत्त बॉक्सर फ्लॉयड मेवेदरला मागे टाकले आहे. वेतन व मान्यता कराराच्या माध्यमातून मेस्सी 127 मिलियन डॉलर्सची कमाई करतो. त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डो व नेमारलाही मागे टिकले आहे. 
 
 
मेस्सीचा कट्टर प्रतिस्पर्धी व ज्युव्हेंट्‌स व पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डो 109 मिलियन डॉलर्सची, तर  ब्राझील व पॅरिस सेंट जर्मनचा स्टार स्ट्रायकर नेमार 105 मिलियन डॉलर्सची कमाई करतो. श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या तीन स्थानावर फुटबॉलपटूंनी स्थान मिळविले असून चौथे स्थान मेक्सिकोचा मिडलवेट बॉक्सिंग स्टार साऊल कॅनेलो अल्वारेझने मिळविले आहे. तो 94 मिलियन डॉलर्सची कमाई करतो. स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर पाचव्या क‘मांकावर असन तो 93.4 मिलियन डॉलर्स कमाई करतो.