नीरव मोदीचा जामीन चौथ्यांदा फेटाळला

    दिनांक :12-Jun-2019
लंडन,
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीचा लंडनमधील रॉयल कोर्टस्‌ ऑफ जस्टिजने जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे. आज चौथ्यांदा नीरवचा जामीन नामंजूर करण्याचा आला. मात्र, अलीकडेच नीरवसाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. 12 तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार असल्याचे वृत्त चर्चेत आहे. 
 
 
नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये 19 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.