#ICCWorldCup2019 : ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान

    दिनांक :12-Jun-2019
स्थळ : टाऊंटन
वेळ : दु. 3.00 वाजतापासून
टाऊंटन,
आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील १७ वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामी फलंदाज इमाम उल हक ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशी होन हात करण्यास सज्ज झाला आहे. 23 वर्षीय इमाम हा पाकिस्तानचा महान क्रिकेटपटू इंझमाम उल हक याचा पुतण्या आहे. 

 
 
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या प्रभावी मार्‍याला चोख प्रत्युत्तर दिल्याने माझा आत्मविश्वास बळावला आहे. त्याचा फायदा मला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान मार्‍याला देण्यास निश्चित होईल, असा विश्वास इमामने व्यक्त केला.
 
स्टार्क हा धोकादायक नाही. परंतु मी त्याच्याशी दोन हात करण्यास उत्साहित आहो. आर्चर व वूड यांच्याबद्दलही असेच बोललो होतो, परंतु त्यांच्याविरुद्ध मी आत्मविश्वासाने खेळलो, असे तो म्हणाला. नॉिंटगम येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इमामने 44 चेंडूत जबरदस्त 88 धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानने 8 बाद 348 धावा रचल्या आणि ही त्यांची विश्वचषकातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या ठरली. हा सामना पाकने 14 धावांनी जिंकला. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला वेस्ट इंडीजकडून सात गड्यांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ 105 धावातच गारद झाला.
 
दक्षिण आफ्रिकेत मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कॅगिसो रबाडा व डेल स्टेनविरुद्धही खेळलो आहे, असे इमामने यावर्षी दक्षिण आफ्रिकेतील दौर्‍याचा संदर्भ देत सांगितले.
 
इमाम हा पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज असून त्याने पाच सामन्यात एक शतकासह 271 धावांची नोंद केलेली आहे.