लिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीचे व्यवस्थापन

    दिनांक :12-Jun-2019
• डॉ. प्रदीप एन. दवने
• डॉ. एकता दी. बागडे
 
4) एन.ए.ए. चा 10 पीपीएम (10 मि.ली.) + 1 टक्का युरिया मिश्रणाचा झाडावर फळे वाटाण्याएवढी होण्यापूर्वी दरमहा फवारा करावा. पडलेली किडकी सडकी फळे नाहीशी करावीत. एन.ए.ए. 10 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची जून-ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्याचा दुसर्‍या आठवड्यात झाडांवर फवारणी करावी.
5) बागेभोवती शेवरी वगैरे वारा प्रतिबंधक झाडे दक्षिण व पश्चिम दिशेला लावणे फायद्याचे ठरेल.
मृग बहाराच्या फळांची गळ कमी करण्याकरिता उपाय ः खतांची मात्रा, पाण्याच्या पाळ्या, पाण्याचा व्यवस्थित निचरा, रोग व किडींपासून संरक्षण याविषयी वरीलप्रमाणे काळजी घ्यावी. शिवाय फळे वाटाण्याएवढी होण्याच्या काळात एन.ए.ए. 10 पीपीएम + 1 टक्का युरियाची झाडावर फवारणी 1 महिन्याचे अंतराने दोन वेळा करावी. 
 
 
फळगळ व्यवस्थापनासाठी काही खबरदार्‍या : 
* वाढणार्‍या फळांना पुरेसे पोषण मिळण्यासाठी झाडावर भरपूर हिरवी पालवी राहावी म्हणून अन्नद्रव्यांचा शिफारशीनुसार संतुलित वापर करावा.
* संत्रा फळांची तोडणी झाल्यानंतर लगेच वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
* पावसाळ्यात बगिचात पाणी साठू देऊ नये.
* फळांच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा पुरेसा पुरवठा करावा.
* बगिचात गळून पडलेली फळे ताबडतोब उचलून दूर फेकून द्यावीत किंवा कंपोस्ट खड्‌ड्यात पुरून टाकावीत.
* 2,4-डी व जिबरेलिक आम्ल रसायने पाण्यात पूर्णपणे विद्राव्य नसल्यामुळे ही रसायने आधी 40-50 मि.ली. अल्कोहोल किंवा ॲसिटोनमध्ये विरघळून घ्यावीत.
फळगळीची शास्त्रीय कारणे व उपाययोजना :
* संत्रावर्गीय झाडे रोगग्रस्त, दुखापतग्रस्त व अधिक वयाची झाली असल्यास झाडांवरील किडी व रोगांचा बंदोबस्त करावा.
* झाडांमध्ये ऑक्झिनचे असंतुलन झाल्यास प्लॅनोफिक्स 3 ते 5 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* कर्ब : नत्र गुणोत्तरामध्ये असंतुलन, कॅल्शियम अनुपलब्धता असल्यास अन्नद्रव्याद्वारे त्याची पूर्तता करावी.
* खतांची योग्यवेळी मात्रा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फवारणीद्वारे पूर्ण करावी.
* पाण्याचा ताण व अतिरिक्त वापर टाळण्याकरीता ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा संतुलित वापर करावा व पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी चर खोदून बाहेर काढावे.
* उन्हाळ्यातील तापमानातील चढउतार बघून उन्हाळ्यात वाफे गवताने किंवा पॉलिथीनने झाकावे.
* रस शोषणार्‍या पतंगाचा प्रादुर्भाव व फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्याकरीता बगिचा तणविरहित ठेवणे व कामगंध सापळे बगिचामध्ये लावावे.