आजचे राशी भविष्य, दि. १२ जून २०१९

    दिनांक :12-Jun-2019

मेष- नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील. त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कामांमध्ये वक्तशीरपणा असेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. तुमची जबाबदारी पार पाडाल.

वृषभ- वायफळ खर्च होऊ शकतो. तुम्हाला थोडं सावधगिरीने काम करण्याची गरज आहे. इतरांच्या मताने विचार करुन स्वत:चं नुकसान कराल. पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. काहीजण तुम्हाला चुकीचं समजतील. पोटाचे विकार त्रास देतील. 

मिथुन- व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांशी असणारे संबंध सुधारतील. कामाचे नवे प्रस्ताव तुमच्याकडे येतील. सरकारी कर्मचाऱ्यांची अडकलेली कामं पूर्ण होतील. साथीदाराची मदत मिळेल.

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामांचा फायदा मिळेल. दिवस चांगला असेल.

सिंह- सहकाऱ्यांचं सहकार्य न मिळाल्यामुळे चीडचीड होईल. तणाव आणखी वाढेल. आज काही गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. सावधगिरी बाळगा. भागीदारी आणि दैनंदिन कामं पूर्ण करताना महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. दिवस चांगला असेल. अन्नाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

कन्या- नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळेल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. स्वत:साठी थोडा वेळ काढा. काही बाबतील तुम्हाला स्वत:चीच साथ मिळेल. साथीदाराचं सहकार्य मिळेल. शुभवार्ता मिळेल.

तुळ- व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळतील. सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. आज तुम्ही असं काही काम कराल, ज्यामुळे तुम्ही प्रशंसेस पात्र असाल. शुभवार्ता मिळेल. अडचणीत अडकलेल्या कोणा एका व्यक्तीची मदत कराल. गुंतवणूकीच्या नव्या संधी मिळतील. धनलाभ होण्याची संधी आहे.

वृश्चिक- व्यापाराच्या दृष्टीने नवे बेत आखाल. नोकरीच्या ठिकाणीही असंच काहीसं वातावरण असेल. अर्थार्जनाची चांगली संधी आहे. जुनी कामं पूर्णत्वास जातील. तुम्ही आखलेल्या बेतांमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील.

धनू - दैनंदिन कामांमध्ये मन जास्त रमेल. लहानसहान गोष्टींवर चीडचीड केल्यामुळे गोष्टी बिघडू शकतात. अतिघाई करु नका. सावधगिरीने काम करा. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांमुळे अडचणी येतील.

मकर- व्यापारात पैसे अडकतील. गुंतवणूकीच्या बाबतीत सावध राहा. आर्थिक गोष्टींमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक जबाबदारीकडे दुर्लक्ष करु नका. मानसिक तणाव आणि थकवा जाणवेल.

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी दिवस बेताचा असेल. प्रत्येकाशी संवाद साधताना विनम्रतेने बोला. भावना व्यक्त करण्यास संकोचू नका. कामं अपूर्ण असल्यामुळे तुमची चीडचीड होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका.

मीन- नव्या व्यवसायात मन रमेल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. कागदोपत्री कामं पूर्णत्वास न्या. प्रवासयोग आहेत. आरोग्याची काळजी घ्या.