सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ

    दिनांक :12-Jun-2019
नवी दिल्ली,
अभिनेत्री, डान्सर, सिंगर आणि बिग बॉस-11 ची स्पर्धक सपना चौधरीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सपनाच्या शोमध्ये नेहमीच चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी सपनाचा उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये शो पार पडला, तेथे चाहत्यांनी काही वेळ गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.

 
सपना चौधरीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. मुरादाबाद रेल्वे स्टेशन स्टेडियममध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. सपना चौधरीची एन्ट्री होताच तिला पाहण्यासाठी जमलेली चाहत्यांची गर्दी अनियंत्रित झाली. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणेही काहीवेळ कठीण बनलं होतं.
चाहत्यांची गोंधळ घालायला सुरुवात केल्याने अखेर पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. मात्र तरीही सपना चौधरीचे चाहते मागे हटण्यास तयार नव्हते. या गोंधळादरम्यान सपना चौधरीने काही वेळ एका गाण्यावर डान्स केला आणि निघून गेली. त्यानंतर तिचे चाहते शांत झाले. या गोंधळाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सपना चौधरीच्या शोमध्ये गोंधळ झाल्याचा हा पहिला प्रकार नाही. याआधी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सपना चौधरीचा शो म्हणजे पोलिसांसाठी मोठं आव्हान असतं. सपना चौधरी बिग बॉस- 11 मध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर ती बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये झळकली होती.