सपा नेत्याच्या घरावर सीबीआयची धाड, खाण घोटाळा प्रकरण

    दिनांक :12-Jun-2019
नवी दिल्ली,
खाण घोटाळा प्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्या आहे. याप्रकरणी दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील 22 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. तसेच, सीबीआयकडून अमेठीतील गायत्री प्रजापती यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे.
 
 
 
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय खाण घोटाळ्याची चौकशी 2016 पासून करीत आहे. याप्रकरणी सीबीआयने अज्ञात आरोपींसह सरकारी अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार असताना हा खाण घोटाळा झाला होता.
 
याआधी जानेवारी महिन्यात सीबीआयच्या अधिकार्‍यांनी लखनौ, कानपूर, हमीरपूर, जालौन आणि दिल्लीमधील 14 ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी सीबीआयने लखनौमधील हुसैनगंज येथील आयएएस अधिकारी बी. चंद्रकला यांच्या घरावरसुद्धा छापा टाकला होता. दरम्यान, गायत्री प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून सध्या ते कारागृहात आहेत.