ताराला आवडतात सिद्धार्थच्या ‘या’ तीन गोष्टी

    दिनांक :12-Jun-2019
‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून अभिनेत्री तारा सुतारीयाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अनन्या पांडे व टायगर श्रॉफदेखील होते. अनन्यानेही आताच सिनेसृद्धतीत पदार्पण केले असून हा तिचा पहिलाच चित्रपट होता. पण, तारा कायमच एका विशेष गोष्टीमुळे चर्चेत असते. सिनेसृष्टीत अफेअरच्या चर्चा कायमच रंगत असतात. तारा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरच्या सुद्धा अनेक चर्चा सिनेसृष्टीत आहेत.
 
 
नुकतंच एका मुलाखतीत ताराला विचारण्यात आले की, “सिद्धार्थच्या कोणत्या तीन गोष्टी सगळ्याच मुलींना आवडतील?” हा प्रश्न रॅपिड फायर राउंडमध्ये ताराला विचारण्यात आला. यावर ताराने बराच विचार करून उत्तर दिले. ती म्हणाली की, “त्याचे डोळे, त्याचा आवाज आणि त्याचं नृत्यकौशल्य प्रत्येक मुलीला आवडू शकतं.” तारा व सिद्धार्थ एकत्र आहेत अशा अनेक चर्चा आहेत. त्या दोघांना अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी एकत्र पहिले आहे. पण, त्यांनी मात्र याविषयी मौन बाळगले आहे.
हे दोघेही सध्या एका चित्रपटात एकत्र काम करत असून त्यांच्या जोडीची जादू रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. तमिळ सुपरहिट चित्रपट ‘RX 1००’ च्या हिंदी रिमेकमध्येही तारा झळकणार आहे. या चित्रपटातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.