काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPFचे पाच जवान शहीद

    दिनांक :12-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
अनंतनाग,
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर हल्ला केला आहे. दहशतावाद्यांनी अनंतनाग बस स्थानकाजवळ के. पी. रोडवर केलेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत तर दोन्ही हल्लेखोर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  

 
 
एका दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बी / ११६ या बटालियनवर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला केला. ज्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले. या घटनेत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. घटना घडली त्या परिसरात सर्व बाजुंनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाय आणखी जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबारही सुरू आहे. अशी माहिती सीआरपीएफकडून देण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 
या अगोदर जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. शिवाय गोळीबारात एक जवान जखमी देखील झाला होता. पाकिस्तानच्या गोळीबारास भारतीय सैन्याकडून सडतोड प्रत्युत्तर देण्यात आले होते.