कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी

    दिनांक :12-Jun-2019
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू – काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.
 

 
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करेल. अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने ‘जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९’ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल.
 
 
केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक २०१९ ला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीलआ आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर कॅबिनेटची ही पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. ज्यामध्ये सरकारच्या नजीकच्या व दुरगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली.