कंटेनेरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

    दिनांक :13-Jun-2019
सेलू: लग्न समारंभ आटपून आपल्या गावी नागपूर येथे जात असलेल्या एका दुचाकीस्वारास भरधाव येणाऱ्या एका कंटेनेर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी नऊ वाजता येथील विकास चौकात घडली.
 
 
 
 मृतक महिलेचे नाव माधुरी एकनाथ भुते (वय ३०) असे आहे. नागपुरातल्या वाडी परिसरात ती वास्तव्यास होती.  मृतक माधुरी ही आपले पती एकनाथ भुते व ४ वर्षीय मुलीसह देवळी येथील लग्नसमारंभ उरकवून दुचाकीने आपल्या गावी वापस येत होती. दरम्यान सकाळी ९ वाजता येथील विकास चौकात नागपूर कडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनेरने त्यांना जबरदस्त धडक दिली, यात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी जखमी तथा मृतकास नरेश वाटगुळे ,सुजल रननवरे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .अपघात झाल्यानंतर सदर कंटेनेर घटनास्थळावरून पळून गेला यावेळी नगरसेवक हिम्मत अली शहा यांनी वाहनाचा क्र. M H(अस्पष्ट) 7267 असा नोंदविला. घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.