पांढरकवडा येथे नितीन गडकरींच्या हस्ते कृष्णामाई या पुस्तकाचे प्रकाशन

    दिनांक :13-Jun-2019
पांढरकवडा: उद्या १४ जून रोजी पांढरकवडा येथे केंद्रीय बांधकाम आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते कृष्णामाई या कृष्णाबाई कुलकर्णी यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन होत आहे. पांढरकवडा येथील सुराणा भवन येथे संध्याकाळी सहा वाजता या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भैय्यासाहेब उपलेंचवार तर अध्यक्ष म्हणून अण्णासाहेब पारवेकर तसेच पांढरकवड्याच्या नगराध्यक्षा  वैशालीताई नहाते उपस्थित राहतील.
कृष्णाबाई कुलकर्णी या पांढरकवडाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्या अनेक वर्ष पांढरकवडा नगरीच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांच्या मुलांनी मिळून या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे. या प्रकाशनाला पांढरकवडा नगरीच्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. दीपक पतकी, ज्योती अत्रे, डॉक्टर अरुण कुलकर्णी, रंजना लाभे यांनी केले आहे.