वायू चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर !

    दिनांक :13-Jun-2019
पुणे : राज्यात शेतकऱ्यांसह सामान्य जनताही मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहे. वाढत्या उन्हाची दाहकता आता सहन करण्या पलीकडे गेली असतांनाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन दोन दिवस लांबणीवर गेले आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पाडणार असून, मॉन्सून प्रवाहावर परिणाम झाल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन दोन दिवस लांबणार आहे. तर, वातावरणातील बाष्प ओढून घेतल्याने विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागा तर्फे 
देण्यात आली आहे.