फाळणीमध्ये विभक्त झालेल्या कुटुंबीयांसाठी ‘भारत’चे स्पेशल स्क्रिनिंग

    दिनांक :13-Jun-2019
बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या ‘भारत’ या चित्रपटाचा जलवा बॉक्स ऑफिसवर अजूनही कायम आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘भारत’चे क्रेझ भारतीय क्रिकेट संघावर देखील पाहायला मिळाले आहे. सलमानने त्याच्या या चित्रपटासाठी काही स्पेशल स्क्रिनिंग देखील ठेवली होती. या स्क्रिनिंगमध्ये सलमानने कलाकार किंवा बड्या लोकांना न बोलवता काही सर्वसाधारण कुटुंबीयांना देखील बोलावले असल्याचे समोर आले आहे.
 
 
सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावरुन या स्पेशल स्क्रिनिंगबद्दल माहिती दिली आहे. या स्क्रिनिंगसाठी त्याने १९४७ सालच्या भारत-पाकिस्तान फाळणीला सामोरे गेलेल्या कुटुंबीयांना बोलवले होते. दरम्यान अभिनेत्री कतरिना कैफ देखील तेथे उपस्थित होती. हे स्पेशल स्क्रिनिंग मेहबूब या स्टूडिओमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करताना सलमानने ‘१९४७ सालच्या भारत-पाकिस्तान फाळणीला सामोरे गेलेल्या कुटुंबीयांसाठी भारत चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग. त्यांना माझा सलाम’ असे कॅप्शन देण्यात आले होते.
‘भारत’ हा चित्रपट १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये भारताचे होणारे विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचे खुलणारे प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे.
या चित्रपटामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.१९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.