पाण्याचा टँकर पलटला ; एक जखमी

    दिनांक :13-Jun-2019
समुद्रपुर: तालुक्यात सध्या अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. समुद्रपूर शहरात सुद्धा पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. शहराच्या प्रत्येक वार्डात नगर पंचायतीच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात असून आज दुपारी वार्ड क्र १४ मध्ये पाणी घेऊन आलेला टँकर पलटी झाला.यात पाणी वाटप करणारा १८ वर्षीय प्रज्वल प्रकाश घाटे हा युवक जखमी झाला आहे. पालिकेकडून लावण्यात आलेल्या या टँकरच्या चालकाने यापूर्वीही अपघात केल्याचे सांगण्यात आले. अनिल महाकाळकार असे चालकाचे नाव असून त्याला टँकरवर न ठेवण्याची मागणी केली जात आहे.