मृत काळवीटाचे कुत्र्याकडून लचके

    दिनांक :14-Jun-2019
कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रातील प्रकार
वनविभागाच्या अधिका-यांचे काळवीटाच्या संगोपनाकडे दुर्लक्ष
 
उंबडाॅबाजार: कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या कारंजा दारव्हा मार्गावरील कारंजा ते गंगापूर फाट्या दरम्यान असलेल्या रेल्वे फाटका नजीक खुल्या जागेत एका मृत काळवीटाचे काही मोकाट कुत्रे लचके तोडत असल्याचा प्रकार दि. १४ जुन रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आला .
 

 
 
सविस्तर असे की कारंजा -सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या कारंजा दारव्हा मार्गावरील कारंजा ते गंगापूर फाट्या दरम्यान असलेल्या रेल्वेफाटका च्या परिसरात एक काळवीट मृत अवस्थेत आढळून आले . मृत काळवीट  मुख्य रस्तापासुन बरेच दुर असल्याने घातपाताचा संशय घटनास्थळी उपस्थित नागरिकांन मधुन व्यक्त केला जात होता .
विशेष महत्त्वाचे म्हणजे कारंजा सोहळ काळवीट अभयारण्यात बाहेर गांवातील शिका-यांचा मुक्त संचार वनविभागाच्या काही कर्मचारी वर्गांच्या उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकारमुळे वाढीस लागले आहे . सकाळी ७ वाजता च्या सुमारास या घटनेची माहीती देऊनही दुपारी दिड वाजेपर्यंत वनविभागाच्या वतीने दखल घेण्यात आली नव्हती . कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात लगत असणा-या अनेक लहान गावा मध्ये बाजाराच्या दिवशी वन्य प्राण्यांच्या मासाची सर्रास विक्री विक्री होत असल्याची चर्चा आहे  .मात्र संबंधित मास विक्रेत्यांवर वनविभागा कडून काहीच धडक कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .