सनी लिओनी शिकतेय युपी 'स्टाईल' हिंदी

    दिनांक :14-Jun-2019
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘कोका कोला’ असून हा एक विनोदी भयपट आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सनी या चित्रपटासाठी फार मेहनत घेत असल्याचे दिसत होते.
 
 
‘कोका कोला’ हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे.  सनी तिच्या आगमी चित्रपटातील भाषेसाठी फार मेहनत घेत आहे. तीने या चित्रपटासाठी युपीच्या हिंदी बोली भाषेचे धडे घेण्यास सुरुवात केली आहे. 
‘जेव्हा एखादी गोष्ट माझ्या कामाशी संबंधीत असते तेव्हा मी सर्व नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार असते. मग ती एखादी नवीन भाषाही असो. माझी ही मेहनत मला एक यशस्वी अभिनेत्री होण्यास मदत करते. तसेच नव्या गोष्टी शिकण्यात एक वेगळा आनंद असतो. सध्या मी यूपीची हिंदी बोली शिकत आहे आणि ती भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे’ असे सनी म्हणाली.