वटपौर्णिमा नेमकी किती तारखेला ?

    दिनांक :14-Jun-2019
नागपूर:  सांप्रत वटपौर्णिमा नक्की 16 जून 2019 रोजी आहे का 17 जून 2019 रोजी आहे याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे . काही पंचांगात/दिनदर्शिकेत 16 जून रोजी व काही पंचांगात/दिनदर्शिकेत 17 जून रोजी वटसावित्री व्रत दिल्यामुळे जनतेमधे संभ्रम निर्माण झालेला आहे.
 
 
 
 
याविषयी धर्मशास्त्रीय खुलासा असा-
धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांगानुसार पौर्णिमेचा प्रारंभ 16 जून रोजी दुपारी ०१:५१ वाजता होत असून पौर्णिमेची समाप्ती 17 जून रोजी दुपारी ०१:३५ वाजता होत आहे. वटसावित्री व्रतासाठी पौर्णिमा घेताना, पौर्णिमा ही चतुर्दशीने विद्ध असावी व ती सूर्यास्तापूर्वी ३ मुहूर्तांपेक्षा अधिक काल व्यापिनी असावी असे सांगितलेले आहे. ‘सावित्रीव्रते पौर्णिमा सूर्यास्तमयात्पूर्वं त्रिमुहूर्ताधिकव्यापिनी चतुर्दशीविद्धा ग्राह्या, त्रिमुहूर्तन्यूनत्वे परैव ।’ असे धर्मशास्त्र सांगते.
या नियमाला अनुसरून वटसावित्री व्रतासाठी पौर्णिमा 16 जून रोजी मिळत असून 17 जून रोजी मिळत नाही. त्यामुळे वटसावित्री व्रत व वटपौर्णिमेचा उपवास इत्यादी रविवारी 16 जून रोजीच करणे शास्त्रसंमत आहे.
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांगकर्ते
जोतिष रत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७