महत्त्व अखंड ज्योतीचं...

    दिनांक :15-Jun-2019
देवीची आराधना करताना अनेक घरांमध्ये अखंड ज्योत लावली जाते. या दिवसात दिवा तेवता ठेवला जातो. इतर अनेक प्रसंगांमध्येही घरात अखंड ज्योत लावली जाते. अखंड ज्योेत लावण्यामागचा उद्देश आणि महत्त्व आपण जाणून घेऊ या... 
 
  • देवी दुर्गेची अनेकविध रूपं आहेत. दुर्गा देवीच्या प्रत्येक रूपाप्रतीचा भक्तीभाव या अखंड ज्योतीच्या माध्यमातून व्यक्त होतो. देवी दुर्गा प्रेमळ आहे. ती आपल्या भक्तांना जवळ घेते. मायेची ऊब देते. दुसरीकडे ती रणरागिणी, चंडिकाही बनते. दुष्टांचा संहार करण्यासाठी ती कालीमाताही होते. हा अग्नीही याचंच प्रतीक आहे. अग्नी तुम्हाला ऊब देतो तर दुसरीकडे जाळून भस्मही करू शकतो.
  • अखंड ज्योत हे आशास्थान मानलं जातं. या ज्योतीप्रमाणे आपणही आयुष्यात कधी हार मानू नये. अडचणींमुळेे निराश, हताश होऊ नये. ही छोटी ज्योत अंधार दूर करते, आपल्याला प्रकाशाची वाट दाखवते त्याचप्रमाणे आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याची क्षमताही आपल्यात आहे असा संदेश ही ज्योत देते. ही ज्योत याचंच प्रतीक म्हटलं पाहिजे.
  • भक्तीमार्गाला लागल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होईल. तुमचं जीवन आनंदाने उजळून जाईल. तुमच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होईल.
  • अखंड ज्योतीचा संकल्प केला असेल तर ती सतत तेवत रहायला हवी. ही ज्योत दिवसरात्र तेवत ठेवायला हवी.
  • अखंड ज्योत तेवत असलेल्या घरावर देवी दुर्गेची कृपा राहते, असं मानलं जातं. घरात उत्साही आणि आनंदी वातावरण राहतं. वाईट शक्तींचा प्रभाव टिकू शकत नाही.
  • अखंड ज्योतीचा संकल्प केल्यास आपल्या मनात कधीही नकारात्मक विचार येत नाहीत.
  • अखंड ज्योत तेवत असेल तर घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव टिकून रहात नाही.