सुनेचा सासूवर विळ्याने हल्ला

    दिनांक :15-Jun-2019
पिंपळखुटा संगम येथील प्रकार
 
मंगरुळनाथ: तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथील शेतीच्या वादावरुन सुनेने सासुवर विळ्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 
 
 
 
 
संगम येथील रहिवाशी असलेल्या सुमन रामदास धोटे यांच्या घरी त्यांची सून मनीषा धोटे संध्याकाळच्या सुमारास आली. सुमन या शेती करून आपले पोट भरतात या शेतीवर त्यांची सून मनीषा हिने हक्क सांगत आधी धक्का बुक्की केली आणि नंतर विळ्याने हल्ला केला. या घटनेत सुमन धोटे जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी मनीषा धोटे आणि प्रतीक धोटे यांच्यावर विविध कलमा नुसार गुन्हा नोंदविला आहे.