'83'साठी दिपीका पादुकोणला १४ कोटी?

    दिनांक :15-Jun-2019
मुंबई
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी '83' या सिनेमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमासाठी दीपिकाला चक्क १४ कोटी रुपयांची भारीभक्कम रक्कम मिळाल्याची चर्चा आहे. बरं रक्कम भारी पण तिची भूमिका मात्र एकदम लहानशीच आहे.
 
 
या चित्रपटात रणवीर भारतीय कर्णधार कपिल देव यांची भूमिका करत आहे, तर दिपीका त्यांची पत्नी रोमी भाटीया यांची भूमिका साकारणार आहे. अशी चर्चा आहे की दीपिका या चित्रपटात छोटासा रोल करण्यासाठी तयार नव्हती. म्हणूनच तिला इतकी मोठी ऑफर देण्यात आली. निर्माते १४ कोटी रुपये मोजण्यास तयार झाल्यावर तिनं या सिनेमासाठी होकार कळवला. या चित्रपटात पहिल्यांदा विश्वचषक जिंकणऱ्या भारतीय क्रिकेट संघाची कहाणी सांगितली आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी इंग्लडमध्ये उपस्थित आहे.