रस्त्याच्या कडा अर्धवट भरल्याने अपघाताला आमंत्रण

    दिनांक :15-Jun-2019
आजनसरा: शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेक ठिकाणी दुर्दशा झालेली दिसून येत आहे, मात्र जिथे रस्ता व्यवस्थित आहे त्या रस्त्याच्या कडा अर्धवट भरलेल्या आहेत, त्यामुळे प्रवास करतांना अनेक वाहनांचे नुकसान होतात, तर कधी अपघात होऊन अनेकांना जीवही गमावावा लागतो, आजनसरा ही संत भोजाजी महाराजांची संत नगरी असल्याने आजणसरा फुकटा वडनेर मार्गावरून महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांची मोठी संख्या आहे, रविवारी आणि बुधवारी तर दुचाकी सह चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असते, त्यामुळे, या सर्कलचे पं.स. सदस्य डॉ. विजय पर्बत व आजनसऱ्याचे सरपंच श्रावण काचोळे यांनी आमदार समीर कुनावार यांच्याकड़े सतत पाठपुरावा करुण एक कोटी पंधरा लाखांचा नीधी या रस्त्यासाठी मंजूर करुण गेल्या तिन महिन्यापुर्वी या मार्गाची दुरुस्ती करुण घेतली, परंतु ठेकेदारने रस्त्याच्या कामात चाल ढकल करुण रस्त्याच्या बाजूच्या कड़ा अर्धवट भरला, हा मार्ग एकेरी असल्यामुळे समोरून दूसरे वाहन आल्यास बाजु बाजू देणाऱ्या वाहनाला रस्त्याच्या खाली उतरवावे लागते, परंतु रस्त्याच्या कड़ा अर्धवट भरल्या गेल्याने अनेक ठिकाणी अर्धा ते एक फूटापर्यन्त ख ड्डे आहेत, त्यामुळे वाहन पल्टी होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, या रसत्यावरुण वाहन खाली उतरणे म्हणजे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे होत आहे, अनेक ठिकाणी मुरम व दगडाचे ढिगारे पडलेले आहेत, यासंदर्भात आजणसरा तथा फुकाटा ग्रामवासीयांनी अनेकदा लोकप्रतीनिधींना ही बाब लक्षात आणून दिली, परंतु काही फायदा झाला नाही व रस्त्याच्या कडा अर्धवट भरुन ठेकेदारने पोबारा केला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे एखाद्याचा जीव जाण्याआधी जर या कडा भरल्या गेल्या नाहीत तर याला जबाबदार कोण राहणार असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.