तक्रारदाराच्या बहिणीनीला पोलिसाची शरीर सुखाची मागणी

    दिनांक :15-Jun-2019
नागपूर: पोलिसाकडे एक समाज रक्षक म्हणून आपल्याकडे पहिले जाते, पण नागपुरात रक्षकच भक्षक बनल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. अजनी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक एस.एस. टेमगिरे याने एका हत्याकांडात जखमी झालेल्या तक्रारदाराच्या तरूण बहिणीला व्हॉट्‌सऍपवर अश्‍लिल फोटो पाठवून चित्रपट पाहण्यासाठी तगादा लावला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पीएसआयविरूद्ध गुन्हा दाखल. या प्रकरणामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे.
 

 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 21 मे रोजी अजनीत धोबी मोहल्ल्यात आशुतोष या युवकाचा पाच ते सहा आरोपींनी कट रचून तलवार-गुप्तीने भोसकून खून केला होत तर या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी युवक याने अजनी ठाण्यात तक्रार दिली होती. या हत्याकांडात पोलिस उपनिरीक्षक संजय टेमगिरे हा तपास अधिकारी होता. त्यामुळे जखमी युवकाचे बयाण घेण्यासाठी तो घरी आला. त्यावेळी त्या युवकाची 25 वर्षीय बहिण सरिता (बदललेले नाव) हिच्यावर नजर पडली. त्यामुळे तो तपास करण्याच्या बहाण्याने तो वारंवार घरी येत होता तर नंदिताला वारंवार पोलिस ठाण्यात बोलवित होता. पीएसआय टेमगिरेची वाईट नजर असल्याची कल्पना नंदिताला आली होती. मात्र, वर्दीतील अधिकाऱ्याच्या विरोधात कोण दखल घेणार? म्हणून ती गप्प बसली.
27 मे ते 31 जून पर्यंत टेमगिरेने तिला भावाचे कपडे घेऊन पोलिस ठाण्यात बोलावले. तिला रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवणे, तिच्याशी अश्‍लिल शब्दात संवाद साधणे तसेच चित्रपट पाहण्यासाठी टॉकिजमध्ये येण्यासाठी वारंवार विचारणे असे प्रकार सुरू केले. 13 जूनला सकाळी अकरा वाजता पीएसआय टेमगिरेने चित्रपटाचे तिकिट नंदिताच्या वॉट्‌सऍपवर पाठविले. त्यानंतर तिला तगादा लावला. मात्र, तिने त्याचा प्रस्ताव धुडकावला.