आलापल्ली ची प्रियंका राजूरकर जे ई ई ऍडव्हान्स मध्ये भारतात २११ वी

    दिनांक :15-Jun-2019
आलापल्ली: भारतीय तंत्रज्ञान संस्थेसह(आय आय टी)देशातील राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जे ई ई ऍडव्हान्स 2019 च्या परीक्षेत आलापल्ली येथील प्रियंका हरिश्चंद्र राजूरकर हिने भारतातून ओबीसी प्रवर्गात 211 वी रँक प्राप्त करून मोठे यश मिळविले आहे. देशातील प्रतिष्ठित आय आय टी संस्थे मध्ये प्रवेशासाठी अत्यंत कठीण परीक्षा घेतली जाते. प्रियांका हिने वयाच्या अकराव्या वर्षांपासूणच आय आय टी प्रवेशासाठी विजयवाडा येथील डॉ.के के आर गौथम इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश घेऊन तयारी सुरू केली.
 

 
 
आलापल्ली सारख्या छोट्या गावातून तिने आय आय टी प्रवेशा चे स्वप्न बघून तिने ते प्रतक्ष्यात साकारले आहे. यासाठी तिने कठीण परिश्रम घेऊन अभ्यास केला होता. तिचे प्राथमिक शिक्षण आलापल्ली येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले आहे. तिचे वडील हरिश्चंद्र राजूरकर हे आलापल्ली येथील राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तिला आय आय टी मुंबई मधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये पुढील शिक्षण घेण्याची इचछा आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. प्रियांकाने आपल्या यशाचे श्रेय आई वडील,गुरुजन यांना दिले आहे.