#ICCWorldCup2019 : 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम

    दिनांक :16-Jun-2019
मँचेस्टर,
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगली धुलाई या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या राहुलने पहिल्या विकेटसाठी रोहितला तोडीसतोड साथ दिली.  

 
सामन्याच्या दहाव्या षटकार रोहितला बाद करण्याची आयती संधी पाकिस्तानने गमावली. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात असताना लोकेश राहुलने खेळपट्टीच्या मधोमध आलेल्या रोहितला माघारी पाठवले. त्याचवेळी पाकिस्तानच्या खेळाडूने नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. हाच थ्रो यष्टिरक्षकाकडे केला असता तर रोहित बाद झाला असता. त्यानंतर या दोघांनी फटकेबाजी करताना अर्धशतकी भागीदारी केली.
 
रोहितने यावेळी वन डे कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूंत 50 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये सलग पाच अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने स्थान पटकावले. अशी कामगिरी यापूर्वी सचिन तेंडुलकर ( 1994), विराट कोहली (2012), अजिंक्य रहाणे ( 2017-18) यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितने लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना सचिन तेंडुलकर व नवज्योत सिद्धू यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 90 धावांची भागीदारी केली होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम कामगिरी होती. आज तो विक्रम रोहित व राहुल यांनी तोडला.
वर्ल्ड कप स्पर्धेतील ही भारतीय सलामीवीरांनी केलेली आठवी शतकी भागीदारी आहे. पाकिस्तानविरुद्ध प्रथमच त्यांना अशी कामगिरी करता आली.