#ICCWorldCup2019 : सरफराजचे मामा म्हणतात भारत जिंकावा, पण…

    दिनांक :16-Jun-2019
इटावा,
भारत आणि पाकिस्तान या कट्ट्रर प्रतिस्पर्ध्यांविरोधात होणाऱ्या सामन्यावर अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही देशांच्या क्रीडाप्रेमींसाठी हा सामना म्हणजे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाहीये. दरम्यान, पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमद याचे मामा महबूब हसन यांची प्रतिक्रिया आली आहे. महबूब हसन हे उत्तर प्रदेशच्या इटावा येथील रहिवासी आहेत. 

 
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महबूब हसन यांनी भारत-पाक सामन्याबाबत भाष्य केलं आणि भारताच्या विजयाची इच्छ व्यक्त केली. यासोबतच त्यांनी पाकिस्तानचा कर्णधार आणि त्यांचा भाचा सरफराज अहमद यानेही चांगली कामगिरी करावी, जेणेकरुन तो कर्णधारपदी कायम रहावा असे म्हटले आहे.
 
 
 
‘भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगला खेळ करत असून हा शानदार संघ आहे. भारतीय संघ या सामन्यात विजयी व्हावा अशीच माझी इच्छा आहे. पण त्यासोबतच चांगली कामगिरी करण्यासाठी माझा भाचा सरफराज अहमद यालाही माझ्या शुभेच्छा आहेत कारण त्याने चांगली कामगिरी केली तर पाकिस्तानी संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे शाबूत राहिल’, असे  महमूद म्हणाले.