नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

    दिनांक :16-Jun-2019
ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत सिंदेवाही वनविभाग परिक्षेत्रातील नावरगाव, रत्नापूर, वानेरी, गडबोरी या गाव परिसरात धुमाकूळ माजविणाऱ्या व मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या काल संध्याकाळी ७ वाजता जेरबंद करण्यात आले. परिसरातल्या लोकांच्या जीवाला धोकादायक असलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मुख्य वनरक्षकांनी ७ जून रोजी परवानगी दिली होती. त्या अनुषंगाने काळ १५ जून रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रात नाचभट्टी नियत क्षेत्रामध्ये या बिबट्याला डार्ट करून बेशुद्ध केले व नंतर जेरबंद करण्यात आले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविण्यात येईल.