वीज पडल्याने शेतक-याचा मृत्यु

    दिनांक :16-Jun-2019
मोहाडी: अचानक मेघगर्जनेसह आलेल्या पावसादरम्यान अंगावर वीज पडून 42 वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाला. रंगलाल ढबाले रा.महालगाव असे मृतक शेतक-याचे नाव आहे.
शेतीच्या हंगामाला सुरूवात झाली असून मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील शेतकरी रंगलाल ढबाले हे आपल्या पत्नी सोबत शेतावर गेले होते. आज 15 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास परिसरात मेघगर्जनेसह पाऊस आला. यावेळी रंगलाल यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर पत्नी बाजूच्या शेतात असल्याने बचावली. घटनेची नोंद मोहाडी पोलिसांनी केली असून तपास पोलिस निरीक्षक शिवाजी कदम करीत आहेत.