संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप

    दिनांक :16-Jun-2019
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रमुख उपस्थिती
 
नागपूर: रा.स्व. संघ तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी १६ जूनला सायंकाळी ६.३० वाजता सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग २३ जूनला रेशीमबागमधील स्मृती भवन परिसरात सुरू झाला. या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. पहाटे साडेचार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत स्वयंसेवकांचा दिनक्रम असतो. सकाळ व संध्याकाळ शारीरिक कार्यक्रमात खेळ, दंड, समता, नियुद्ध तर दुपारी गटचर्चा, संवाद, बौद्धिक कार्यक्रम होतात. रविवारी १६ जूनला सायंकाळी ६.३० वाजता या वर्गाचा समारोप होणार असून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रामुख्याने उपस्थित राहतील. रेशीमबाग मैदानावर आयोजित समारोपाला उपस्थित राहण्याचे आवाहन रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया व संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी केले आहे.