... हा तर आणखी स्ट्राईक : अमित शाह

    दिनांक :17-Jun-2019
- पाकवरील विजयावर गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया 
 
नवी दिल्ली, 
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळविलेल्या दणदणीत विजयाची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे. भारताने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केला, अशी प्रतिक्रिया शाह यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
अमित शाह यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचीसुद्धा प्रशंसा केली आहे. संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन. तुमची कामगिरी उत्तम होती. भारताच्या प्रत्येक नागरिकाला या विजयाबद्दल अभिमान वाटेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह यांच्यासोबतच अन्य नेत्यांनीही भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.