‘वोलोकॉप्टर’ हवाई टॅक्सी!

    दिनांक :17-Jun-2019
- विजय सरोदे
 
जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी आपल्या वाहनातून (दुचाकी, तिचाकी किंवा चारचाकी) रस्त्यावरुन जात असतो, त्यावेळी आपण ट्रॅफिक जाममध्ये अडकलो तर मनामध्ये डोकावतो की जर हवेत उडून कार्यालयामध्ये पोहोचता आले (सेहरा चित्रपटातील पंख होते तो उड आती रे! या गाण्याप्रमाणे) तर किती बरे होईल! पण आता हे प्रत्यक्षात उतरणार आहे ते ‘वोलोकॉप्टर’ या हवाई टॅक्सीमुळे! या टॅक्सीतून आपण चक्क हवेत उडून आपल्या ऑफिसमध्ये लवकर पोहोचणार आहात व कंटाळवाण्या ट्रॅफिक जाममधून आपली सुटकाही होईल. त्याबरोबरच प्रदूषणही कमी होईल.
 
आता आपण विचार करीत असाल की हे वोलोकॉप्टर म्हणजे आहे तरी काय? वस्तुत: ते एक छोटे हेलिकॉप्टरच असून त्यात फक्त एकच व्यक्ती बसू शकते. इंधनासाठी त्यात बॅटरी लावलेली असून ते ड्रोन तंत्रज्ञानावर उडणार आहे. हे वोलोकॉप्टर अर्थात उडती टॅक्सी थेट टेकऑफ किंवा उड्डाण करू शकते. त्याचे पंख इतके छोटे आहेत की त्याला जमिनीवर उतरण्यासाठी फारशी जागाही लागत नाही. त्यात सुरक्षेची सर्वप्रकारची व्यवस्था आहे. ही बॅटरीवर चालणारी असल्याने जास्त आवाज करणारी नसून तिच्यामुळे प्रदूषणही होत नाही. 
 
 
आपण हे देखील ऐकले असेल ‘उबर ईट’ और ‘स्विगी’ यासारख्या कंपन्या ड्रोनच्या सहाय्याने जेवण पोहोचवीत असतात. अमेझॉन व फ्लिपकॉर्ट या ड्रोनने सामानाची जलद वाहतूक करीत ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत असतात. ओला आणि उबेर या ड्रोनव्दारेे आपणास हवाई टॅक्सीची सेवा देणार आहेत. काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये या वोलोकॉप्टरची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
 
जर्मनीची एक कंपनी सध्या वोलोकॉप्टर तयार करीत असून पुढील वर्षापासून या हवाई टॅक्सीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान उबेरने आपल्या एयर टॅक्सीचा आधिकृत व्हिडिओ जारी केला आहे. तसेच 2023 चा वापर करण्याची योजनाआहे. उबेरच्या एअर टॅक्सीमध्ये 5 से 6 लोक बसू शकतील व तिथे पंखही अॅडजस्टेबल राहतील. याबरोबरच ऊबेर येत्या जुलैपासून आपली हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे. सध्या तरी तिची सुरुवात न्यूयॉर्क येथून होईल व मग ती इतर देशामध्येही सुरू केली जाणार असून त्यात भारताचाही समावेश राहणार आहे.
 
येत्या जुलै महिन्यापासून 5 जी स्पेक्ट्ररमच्या चाचणीस (ट्रायल) प्रारंभ होणार आहे. डिजिटल कम्युनिकेशन कमिशनने दूरसंचार विभागाच्या समितीला यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. विभागातर्फे येत्या दोन आठवड्यात दूरसंचार कंपन्यांना ट्रायलसाठी स्पेक्ट्रम देण्यास प्रारंभ करणार आहे. दूरसंचार कंपन्यांना यासाठी एका वर्षाचे लायसन्स दिले जाणार आहे.
 
15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन मिळविणार्‍या नोकरपेशातील लोकांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच इएसआयसी अंतर्गत भरावयाच्या शुल्कात कपात केली आहे. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांच्या हातात जास्त वेतन येणार आहे. याचा लाभ सुमारे तीन कोटी 60 लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. हा निर्णय येत्या एक जुलैपासून लागू होईल.
(लेखक जळगाव तरुण भारतचे अर्थविषयक स्तंभलेखक आहेत.)