भारताचा 'विराट' विजय

    दिनांक :17-Jun-2019
विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभव स्विकारण्याची परंपरा पाकिस्तान संघाने कायम राखली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. ३३७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ३५ व्या षटकानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान बराच वेळ वाया गेल्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारित लक्ष्य देण्यात आलं. त्यानुसार पाकिस्तानला ५ षटकात १३६ धावा करने भाग होते त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. भारताने दिलेल्या ३३७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध पवित्रा घेत खेळास सुरुवात केली. पहिल्या १० षटकांच्या अखेरीस पाकिस्तानने १ बाद ३८ धावा केल्या. तर १५ षटकांच्या अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ६४ होती. मात्र त्यानंतर बाबर आझम आणि फखर जमानने शतकी भागिदारी करत भारताची डोकेदुखी वाढवली. पण काही वेळातच कुलदीप यादवनं बाबर आझमची विकेट काढत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. ३२ व्या षटकांपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ५ बाद १५४ अशी झाली. त्यानंतर भारत-पाक सामन्यात पावसाचा पुन्हा व्यत्य आला आणि सामना थांबवावा लागला. सुमारे अर्धा तासानंतर खेळ सुरू झाला. मात्र डकवर्थ लूईस नियमानुसार दहा षटकं कमी करून पाकिस्तानला ३०२चं टार्गेट देण्यात आलं. मात्र पाकिस्तानला हे आव्हानही पेलवता आले नाही.