'त्या' प्रकरणातून जामवालची मुक्तता

    दिनांक :17-Jun-2019
जंगली फेम अभिनेता विद्युत जामवाल याला वांद्रे न्यायालयाने दिलासा दिला आहे. एका मारहाणीच्या प्रकरणातून विद्युत जामवालची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.
 
 
२००७ मध्ये जुहूमधील हॉटेल ग्रँड हयात येथे एका व्यवसायिकासोबत विद्युतचे भांडण झाले होते. भांडण विकोपाला जाऊन हाणामारी झाली. या झटापटीत सदर व्यक्तीच्या डोक्यात बाटलीने प्रहार करून मारहाण केल्याप्रकरणी विद्युतविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
 
याप्रकरणाची सुनावणी वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर घेण्यात आली. यावेळी विद्युतला दिलासा देत न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले. विद्युतसह या गुन्ह्यात सामील असलेल्या त्याचा मित्र हरीश नाथ गोस्वामी याचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.